अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
मुंबई – येथे गुटखा, पान मसाला आणि सुगंधी पदार्थ यांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होते. अन्न आणि औषध प्रशासनाने १२ दिवसांत मुंबईतील विविध ठिकाणांहून ३ लाख ८४ सहस्र ४०५ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू हे पदार्थ जप्त केले. या पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली आहे.