मुलीची आई आणि तिची दुसरी मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील एका हिंदु कुटुंबाचे सामूहिक धर्मांतर झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका दर्ग्यात रहाणार्या मौलवीने हिंदु कुटुंबातील सदस्यांना दर्ग्यात बोलावून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केले. दर्ग्यातील मौलवीने कुटुंबातील एका मुलीवर बलात्कार केला. या मौलवीच्या मुलांनी या कुटुंबातील महिला आणि १ मुलगी यांच्यावर बलात्कार बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अक्रम नावाच्या आरोपीला कह्यात घेतले. पोलिसांनी अक्रमसह जुनैन आणि फैजल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पीडित कुटुंबातील महिलेने पोलिसांत प्रविष्ट केलेल्या तक्रारीत मांडलेली सूत्रे
१. माझ्या वडिलांचे प्रयागराज येथे मिठाईचे दुकान आहे. मुश्ताक नावाचा मौलवी आमच्या दुकानात यायचा. ‘मी जादूटोणा दूर करण्याचे काम करतो’, असे सांगून त्याने आम्हाला ‘चमत्कारिक दर्ग्या’विषयी त्यांनी माहिती दिली, तसेच आम्हाला दर्ग्यात जाऊन चादर चढवण्याचा सल्ला दिला.
२. त्याच्या बोलण्याने प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी दर्ग्यात चादर चढवली. पुढे मौलवीने वडिलांना मृत्यूचे भय दाखवून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. त्यांनी दर्ग्याला भेट द्यावी, यासाठी तो त्यांच्यावर दबाव आणू लागला. ‘तसे न केल्यास संपूर्ण कुटुंब आजारी पडेल’, अशी भीती दाखवू लागला.
३. एक दिवस मौलवीने माझ्या मुलीला दर्ग्यात बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीने मौलवीने केलेल्या अत्याचाराची मला माहिती दिली. त्यावर मी मौलवीला विरोध केला असता त्याने आम्हा सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनी मौलवीच्या वासनेला बळी पडलेल्या माझ्या मुलीचा मृत्यू झाला. पुढे काही दिवसांनी मौलवीचाही मृत्यू झाला.
४. मौलवीची ३ मुले अक्रम, जुनैन आणि फैजल यांनी नंतर मला माझ्या दुसर्या मुलीसह दर्ग्यात येण्यासाठी दबाव आणला. तेथे या तिन्ही जणांनी माझ्यावर आणि माझ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणे चालू केले. अंततः त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा आहे. तरीही धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करून त्यातील मुलीचे शोषण केले जाते, यावरून त्यांना कशाचेच भय उरले नसल्याचे द्योतक ! |