रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. ध्यानमंदिरात नामजप करतांना मारुतिराया आणि सहस्रोंची वानरसेना युद्धाच्या सिद्धतेत उभी ठाकली असल्याचे जाणवणे : ‘मी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या ध्यानमंदिरात नामजपासाठी बसलो असतांना श्री पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीकडे पहात होतो. त्या मूर्तीकडे पाहून ‘मारुतिराया युद्धाच्या सिद्धतेत उभे ठाकले आहेत आणि त्यांच्या मागे सहस्रोंची वानरसेनाही आहे अन् तीही युद्धाच्या सिद्धतेत आहे’, असे मला जाणवले. मूर्तीकडे पाहून मला मारक तत्त्वाची अनुभूती येत होती.

२. मी ध्यानमंदिरात काही वेळ नामजप केल्यानंतर मला मोगर्‍याच्या फुलांचा सुगंध आला. तेव्हा ध्यानमंदिरात मोगर्‍याची फुले दिसली नाहीत.

मला दिलेल्या या अनुभूतींसाठी श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रणव ज्ञानेश्वर हिरवे,  पुणे. (३.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक