एका शिबिराच्या वेळी श्री. गिरीजाशंकर अरुण नन्नवरे यांना जाणवलेले साधनेचे महत्त्व

श्री. गिरीजाशंकर नन्नवरे

‘२४.२.२०२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत रामनाथी, फोंडा (गोवा) येथील सनातन आश्रमात एक शिबिर झाले. त्या वेळी आश्रमातील प्रत्येक कणाकणात चैतन्य जाणवले. सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यापासून मला पुष्कळ अनुभूती आल्या. हे एक वेगळेच विश्व आहे. जिथे कुणालाही कुणाविषयी लाभाची अपेक्षा नाही आणि क्रोधाची भावना नाही. त्यामुळे माझ्या लक्षात आले की, हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधना या गोष्टींचे महत्त्व सर्वप्रथम आपल्या कुटुंबापासून सांगितले पाहिजे.’

– श्री. गिरीजाशंकर अरुण नन्नवरे, जळगाव (२४.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक