इस्लामाबाद – पाकिस्तानच्या डेरा गाझी खान कारागृहात अटकेत असलेला मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाच्या कटातील आतंकवादी साजिद मीर याला विष देण्यात आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी आहे. त्याला आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेली आहे.
सौजन्य विऑन