Senthilkumar : संसदेत उत्तर भारतातील राज्यांना ‘गोमूत्र राज्य’ म्हणणार्‍या द्रमुकच्या खासदाराने मागितली क्षमा !

भाजपच्या खासदारांनी लोकसभेत केला होता विरोध !

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजेच द्रविड प्रगती संघ)

नवी देहली – संसदेच्या शीतकालीन सत्रात ६ डिसेंबर या दिवशी द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांनी सनातन परंपरेचा अवमान केल्यावरून क्षमा मागितली. त्यांनी २ दिवसांपूर्वी संसदेत ‘उत्तर भारतीय राज्यांना ‘गोमूत्र राज्ये’ म्हणून हिणवले होते. भाजपच्या नेत्यांनी लोकसभेत याला पुष्कळ विरोध केला होता. त्यावरून सेंथिलकुमार यांनी क्षमा मागत म्हटले की, मी अनावधानाने असे वक्तव्य केले. यातून कुणा सदस्य अथवा वर्ग यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे वक्तव्य मागे घेतो. मला याची खंत आहे. सेंथिलकुमार यांचे हे वक्तव्य लोकसभेच्या कार्यवाहीतूनही काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी ‘एक्स’वरूनही त्यांच्या वक्तव्याविषयी क्षमा मागितली.

सेंथिलकुमार यांच्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी म्हटले होते की, यातून त्यांनी सनातन परंपरांचा अनादर केला आहे.

संपादकीय भूमिका 

मुळात हिंदु धर्म आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांचा कुणीच अवमानच करता कामा नये, अशी पत हिंदूंनीच निर्माण केली पाहिजे !