वासनांध मौलवी !
(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)
हमीरपूर (उत्तरप्रदेश) – येथील कुरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मशिदीत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मौलवी मुनताजीर आलम याला अटक केली. ३० वर्षांचा आलम मशिदीत मुलांना उर्दू शिकवायचा. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर कुरारा पोलिसांनी आरोपी मौलवीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या तक्रारीनुसार, पीडित ११ वर्षीय मुलगी उर्दू शिकण्यासाठी तिच्या लहान भावासमवेत मशिदीत गेली होती. मौलवीने पीडित मुलीच्या भावाला बाहेर बसवले आणि मुलीला मशिदीतील एका खोलीत नेले. तेथे मौलवीने दरवाजा बंद करून मुलीवर बलात्कार केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून मशिदीत शिकण्यासाठी आलेल्या इतर मुलांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. त्यानंतर आरोपी मौलवीने मुलीला सोडून दिले. पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात घरी पोचली तेव्हा कुटुंबियांना धक्काच बसला. कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.