१. प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या घरी ठेवलेली तीन प्रकारची शेवंतीची फुले
१ अ. प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांनी ठेवलेली फुले : ‘डिसेंबर २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आले होते. तेव्हा ११.१२.२००२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे छायाचित्र काढले होते. त्या वेळी त्यांच्या चरणांवर शेवंतीची फुले वाहिली होती. त्या वेळी कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) यांनी त्यातील दोन फुले श्रीमती विमल फडके (आताच्या प.पू. (कै.) विमल फडकेआजी) यांना दिली होती. आजींचा पुष्कळ भाव असल्याने त्यांनी ती फुले ‘प.पू. डॉक्टर यांच्या चरणांवर वाहिलेली फुले’ या भावाने जपून ठेवली.
१ आ. श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी ठेवलेली फुले : २५.११.२००५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी घरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी फुले वाहिली होती (प.पू. फडकेआजी यांची मुलगी, आताची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे). तीही शेवंतीची फुले होती. ती फुलेसुद्धा दुसर्या दिवशी चांगली राहिली होती. तेव्हा हे मनीषा गाडगीळ यांनी त्यांची आई प.पू. फडकेआजी यांना सांगितले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘चांगली आहेत, तर ती फुलेही जपून ठेव.’’ ती फुलेही अजून चांगली आहेत.
१ इ. श्री. निनाद गाडगीळ यांनी ठेवलेली फुले : मी जानेवारी २०१६ मध्ये सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. त्या वेळी प.पू. रामभाऊ स्वामी आश्रमात यज्ञासाठी आले होते. त्यांनी १७.१.२०१६ या दिवशी उच्छिष्ट गणपति यज्ञ केला होता. त्या वेळी तेथील पूजेत शेवंतीची फुले होती. त्यातील २ फुले मला उपायांसाठी दिली. मी ती फुले पनवेल येथील आमच्या घरी आणली. त्या फुलांकडे पाहून मला चांगले वाटले. ‘माझी आजी (प.पू. (कै.) विमल फडके) आणि माझी आई (श्रीमती मनीषा गाडगीळ) यांनी फुले जशी सांभाळून ठेवली होती, तशी आपणही ठेवावीत’, असा विचार माझ्या मनात आला आणि ‘ती फुलेही मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आहेत’, या भावाने मी जपून ठेवली. प.पू. डॉक्टर यांच्या कृपेमुळे ती फुलेही अजून चांगली राहिली आहेत.
२. तिन्ही फुलांच्या संदर्भातील सूत्र
अ. तिन्ही फुलांच्या डब्या प.पू. फडके आजी यांच्या निवासस्थानी असलेल्या प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांसमोर ठेवलेल्या आहेत.
आ. तिन्ही फुले प्लास्टिकच्या डबीत ठेवलेली आहेत. ती अनेक वर्षांपासून डबीतच आहेत.
इ.फुले काही वेळ उन्हात ठेवणे किंवा डबीचे झाकण उघडून त्यांना वारा लागू देणे, असे काहीच केलेले नाही. डबी कायम बंदच ठेवलेली असते, तरीसुद्धा फुले चांगली राहिलेली आहेत.’
– श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन संकुल, देवद, पनवेल (१.७.२०२३)
प.पू. रामभाऊ स्वामी यांच्या संदर्भातील लेखासाठी : https://www.sanatan.org/en/a/2729.html |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |