भारताच्या पराभवाचा आनंद साजरा केल्याचे प्रकरण
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. यामुळे भारतियांना दुःख झाले; मात्र काश्मीरमधील शेर-ए-कश्मीर विद्यापिठाच्या कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकणार्या मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत फटाके फोडत आनंद साजरा केला. त्यांच्या या आनंद साजरा करण्यावर इतर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत तक्रार केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशविघातक कारवाया केल्याच्या (यु.ए.पी.ए.च्या) आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील जिहादी आतंकवाद का नष्ट होत नाही, हे या घटनेतून दिसून येतेे. तेथील धर्मांध मुसलमान जिहादी मानसिकतेचे असल्याने ही मानसिकता जोपर्यंत नष्ट केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्यच आहे ! |