(म्हणे) ‘एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत नाही, तर कुराण शिकवा !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क

समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय परिषद आणि शैक्षणिक संशोधन संस्थेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश करण्याऐवजी कुराणाचा समावेश करावा, अशी मागणी येथील समाजवादी पक्षाचे खासदार  डॉ. शफीकुर्रहमान बर्क यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी एन्.सी.ई.आर्.टी.च्या समितीने शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. असे असले, तरी एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘अशा प्रकारची कोणतीही समिती स्थापन करण्यात आलेली नाही’, असे स्पष्टीकरण देत रामायण आणि महाभारत यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे सूत्र नाकारले आहे.

सौजन्य: IndiaTV

खासदार बर्क म्हणाले की, कुराणापेक्षा मोठा ग्रंथ कोणताच नाही. एन्.सी.ई.आर्.टी.ची समिती देशभक्तीच्या नावाखाली रामायण आणि महाभारत शिकवण्याची शिफारस करत आहे. जगातील कोणत्याही शिक्षणामध्ये देशभक्तीची उणीव नाही. सर्व धर्मांच्या शिक्षणामध्ये देशभक्ती आहे. (असे आहे, तर ‘मुसलमान वन्दे मातरम् म्हणण्याचे का नाकारतात ?’, हे बर्क यांनी सांगायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?