भारतीय राष्ट्रध्वज पायदळी तुडवला !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या टोरँटो येथील मिसिसॉगा भागातील कालीबारी मंदिराला २५ नोव्हेंबरच्या सायंकाळी खालिस्तानवाद्यांनी घेराव घालत निदर्शने केल्याची घटना घडली. या वेळी खलिस्तान्यांनी भारतीय राष्ट्रध्वज पायदळी तुडवत त्याचा अवमानही केला. घेराव घालणारे खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारत आणि त्याच्या राजनैतिक अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप करत होते, तसेच त्यांनी भारतीय हिंदूंना त्यांचे समर्थन करण्याचे आवाहनही केले.
स्थानिक हिंदूंकडून खलिस्तानी चळवळ दडपण्यासाठी पैसे गोळा करून तो भारतीय राजनैतिकांना देण्यात आल्याचा आरोपही खलिस्तान्यांनी केला. (खलिस्तान्यांसाठी भारतातून किती जण पैसे गोळा करतात, याची चौकशी भारताने केली पाहिजे आणि संबंधितांना देशद्रोहाच्या अंतर्गत कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकॅनडातील भारत आणि हिंदुविरोधी खलिस्तान्यांचा भारतातील शीख उघडपणे विरोध का करत नाहीत ?, याचे उत्तर भारतियांना मिळाले पाहिजे ! |

Modi & Donald Trump G7 Meet : जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू ! – ट्रम्प
Strait Of Hormuz : इराणला आता असे शस्त्र मिळाले आहे, जे अणूबाँबपेक्षा अधिक प्रभावी !
रशियन तेलवाहू नौकेच्या भारतीय कॅप्टनच्या अटकेने रशिया संतप्त
Muslim man arrested for spying for Pakistan : जैसलमेर (राजस्थान) येथून पाकसाठी हेरगिरी करणार्या मुसलमानाला अटक
A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी