‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
१. ‘खोटे कथानक’ म्हणजे काय ?
जेव्हा पद्धतशीरपणे विशिष्ट विचारसरणी निर्माण केली जाते, त्याला ‘खोटे कथानक’ (नॅरेटिव्ह) असे म्हणतात. एखाद्या मूळ विषयावरील चित्रफितीतील लहान तुकडा विशिष्ट पद्धतीने प्रसारमाध्यमांमधून प्रसारित केला जातो. त्यामुळे ते पहाणार्या व्यक्तीच्या मनात द्वेष निर्माण होतो. या गोष्टी आपल्यासमोर अशा पद्धतीने ठेवल्या जातात की, ज्यामुळे मन, मस्तिष्क आणि विचार त्याच दिशेने (हिंदुद्वेषी) विचार करू लागतात. अशाच प्रकारे मध्यंतरी ‘हिंदु आतंकवाद’ (भगवा आतंकवाद) नावाचे एक खोटे कथानक निर्माण करण्यात आले होते.
२. आतंकवाद्यांना ‘अतिरेकी’ ठरवणारे खोटे कथानक
वास्तविक अमेरिकेच्या ‘बेसिक नेटेड फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन’ या सूचीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांची नावे आहेत; पण त्यात आपल्याला कुठेही हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नाव दिसत नाही, तसेच ‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील जागतिक आतंकवादी संघटनांच्या सूचीमध्येही कुठे हिंदुत्वनिष्ठ संघटना नाहीत, तरीही आपल्या देशात ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे खोटे कथानक रचले जाते.
आतंकवादी आणि अतिरेकी यांच्यातील भेद
हे दोन्ही शब्द हिंसा आणि अराजकत यांच्याशी संबंधित आहेत. आतंकवादी, म्हणजे अशा व्यक्ती किंवा गट जे त्यांची वैचारिक, राजकीय अथवा धार्मिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नागरिकांविरुद्ध हिंसा आणि दहशत यांचा वापर करतात अन् त्यासाठी ते अंदाधुंद हिंसाचार, बाँबस्फोट आणि निष्पाप लोकांची हत्या करतात. अतिरेक्यांचे ध्येय अनेकदा विशिष्ट प्रदेशाचे स्वातंत्र्य, सरकारमध्ये किंवा व्यवस्थेत पालट घडवणे, हे असते. त्यासाठी ते हिंसक पद्धत वापरतात. प्रामुख्याने ते नागरिकांऐवजी सुरक्षादल, सरकारी संस्था किंवा विशिष्ट लक्ष्य यांच्या विरोधात हिंसाचार करतात.
– श्री. रमेश शिंदे
काश्मीरच्या एका बातमीमध्ये ‘नो मिलिटंट किल्ड इन लास्ट सिक्सटीन मंथस्’ (मागील १६ मासात एकाही अतिरेक्याला ठार मारले नाही), असे प्रसिद्ध झाले. त्यात ‘आतंकवादी’ असे न लिहिता ‘अतिरेकी’ लिहिले आहे. त्यांनी आतंकवाद्याला ‘अतिरेकी’ असे का लिहिले असावे ? याविषयी आपण कधी गांभीर्याने विचारच केला नाही. ‘द वायर’मध्ये ‘आतंकवाद आणि अतिरेकी सारखे नाहीत’, असे म्हटले आहे. त्यांच्या मते आतंकवाद आणि अतिरेकी हे एकच नाही. ‘काश्मीरमध्ये आतंकवादी नसून अतिरेकी आहेत’, अशा प्रकारे खोटे कथानक पसरवले जाते.
३. धर्मनिरपेक्ष माध्यमांकडून काश्मीरमधील आतंकवाद्यांना ‘अतिरेकी’ ठरवण्याचा प्रयत्न
या ‘द वायर’मध्ये ‘मिलिटंट इन जम्मू अँड कश्मीर अँड द माऊइस्ट’, असे लिहिले आहे. माओवादी किंवा नक्षलवादी हेही दहशत निर्माण करणे, अपहरण करणे, निर्घृण हत्या करणे इत्यादी सर्व वाईट कृत्ये करतात; परंतु त्यांचा वेगळा वर्ग केला आहे. एकाला स्वातंत्र्यसैनिक, तर दुसर्या व्यक्तीला आतंकवादी आणि अतिरेकी म्हटले जाते. याचा अर्थ एका राज्यात जो क्रांतीकारक आहे, तो दुसर्यासाठी आतंकवादी आहे. काश्मीरच्या आतंकवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करण्यासाठी त्यांना ‘आतंकवादी’ न म्हणता ‘अतिरेकी’ म्हटले जाते. आपल्या देशात एवढे मोठे खोटे कथानक चालू आहे आणि आपण ते कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. काश्मीरमध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि ‘मुजाहिद’ (जिहादी) आहेत, तेथे त्यांना आतंकवादी म्हटले जात नाही, तर ‘मुजाहिद’ किंवा स्वातंत्र्यसैनिक म्हटले जाते.

त्यात पुढे ‘पीपल फायटिंग द इंडियन स्टेट ॲज अ मिलिटंट’, असे म्हटले आहे. येथे जे भारत सरकारशी लढतात, त्यांना ‘अतिरेकी’ म्हटले आहे. काश्मीरमधून हिंदूंना पळवून लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, त्यांची निर्घृण हत्या करणे, हे सर्व भारत सरकारशी लढणे आहे का ? हिंदूंचा नरसंहार करूनही ते स्वतःला अतिरेकी किंवा स्वातंत्र्यसैनिक समजत आहेत आणि देशातील प्रसारमाध्यमे त्याला अतिरेकी म्हणत आहेत. यावरून खोटे कथानक कसे रचले जात आहे, हे समजून घेतले पाहिजे.
‘बीबीसी’ प्रसारमाध्यम ‘हमास’च्या आतंकवाद्यांना ‘अतिरेकी’, म्हणते, त्यांना ‘आतंकवादी’ म्हणत नाही. तिच्याही मते काश्मीरमध्ये लढणारे अतिरेकीच आहेत. इस्रायलमध्ये हमासचे आतंकवादी लढत आहेत, तेही आतंकवादी नसून अतिरेकी आहेत. यावरून कसे एकसारखे खोटे कथानके रचली जातात, हे लक्षात येते. टीका झाल्यानंतरही ‘बीबीसी’ हमासच्या आतंकवाद्यांना ‘आतंकवादी’ न म्हणता अतिरेकीच म्हणणार. याचा अर्थ या माध्यमाकडून एकप्रकारचे खोटे कथानक रचण्याची निर्मिती होत आहे, असे दिसून येते. पुढे जाऊन संयुक्त राष्ट्रांना साहाय्य करणारे अधिकृत लोकही हमासला ‘आतंकवादी संघटना’ म्हणत नाहीत. हमासने निर्दाेष इस्रायली लोकांचे हातपाय बांधून त्यांना जिवंत जाळले, तरीही हमासला ‘आतंकवादी संघटना’ नाही, तर ‘मानवतावादी संघटना’ समजायचे का ?
हिंदुविरोधी माध्यमांना भारतीय उद्योगपतींचे साहाय्य
संपूर्ण जगात एक ‘सिंडिकेट मिडिया प्रोजेक्ट’ चालवले जात आहे. त्याला आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आर्थिक साहाय्य करत आहे. आता भारतातही अशा प्रकारचे ‘सिंडिकेट प्रोजेक्ट’ चालू आहे. त्याचा ‘भांडवल निधी (कॉर्पस फंड)’ १०० कोटी रुपयांचा आहे. त्याला ‘विप्रो’ आस्थापनाच्या अझीम प्रेमजी यांच्यापासून टाटा आणि नंदन नीलकेणी यांनी आर्थिक साहाय्य केले आहे.
हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने राज्यघटनेत पालट करण्यासाठी संघटित होणे आवश्यक !
अनेक धर्मांध नेत्यांनी अनेक वेळा त्यांच्या भाषणांमध्ये ‘त्यांची सत्ता येईल, तेव्हा ते ही राज्यघटना मानणार नाहीत आणि ते ही राज्यघटना पालटणार’, असे म्हटलेले आहे. ‘भारतीय राजकीय प्रक्रियेत मुसलमानांचा वाटा’ (मुस्लीम इन इंडियन्स पॉलिटिकल प्रोसेस), हा ओमर खालिदी यांच्या लेखात म्हटले आहे, ‘भारताला हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही. भारत धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) राष्ट्रच रहाणार’, असा वादा काँग्रेसने भारतातील मुसलमानांशी आधीच केला होता. आपण विचार करतो की, इंदिरा गांधींनी आपल्याला वर्ष १९७६ मध्ये धर्मनिरपेक्ष बनवले; परंतु हे वचन तर वर्ष १९४७ च्या आधीचे आहे.
राज्यघटनेत पालट करण्याविषयी आपल्या सरकारने असमर्थतता व्यक्त केली आहे. वास्तविक काँग्रेसने या राज्यघटनेत अनेक वेळा पालट केले आहेत. त्यामुळे आपण काही घटनाबाह्य गोष्ट करत नाही. ‘देशात जे सरकार सत्तेवर येईल, त्यांना राज्यघटनेत पालट करण्याचा संपूर्ण अधिकार आहे’, असे कलम ३६८ मध्ये लिहिले आहे. राज्यघटनेमध्ये १०६ पालट केले आहेत, तर १०७ वा पालटही होऊ शकतो आणि तो हिंदु राष्ट्राचा असू शकतो, हे आपण म्हणण्याची आवश्यकता आहे. या कथानकाच्या दृष्टीकोनातून सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने कार्य करावे लागेल. आपल्याविषयी जे खोटे कथानक रचले आहे त्याला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– श्री. रमेश शिंदे
४. आतंकवादाच्या विरोधात इस्रायलचे ‘जशास तसे’ उत्तर
एका वृत्तानुसार इस्रायलने दावा केला की, हमास ही धार्मिक आतंकवाद करणारी संघटना आहे. याविषयी फार मोठे खोटे कथानक प्रसारमाध्यमांवर चालू होते. त्या वेळी इस्रायलने हमासविषयीच्या चित्रफिती प्रसारित करून लोकांसमोर सत्य उजेडात आणले. ‘हमासच्या आतंकवाद्यांनी लहान मुलांना ‘ओव्हन’मध्ये टाकून ठार केले’, अशी बातमी इस्रायलच्या प्रसिद्ध ‘फर्स्ट रिस्पाईंडर’ या वार्तापत्रामध्ये आली होती. त्यावर एका नेत्याने असे म्हटले, ‘त्या लहान मुलांना बेकिंग पावडर न टाकता ओव्हनमध्ये भाजून टाकले.’ त्यावर ते निर्लज्जपणे लिहितात, ‘बेकिंग पावडर लावून भाजले कि बेकिंग पावडर न लावता भाजले होते ?’, म्हणजे माणुसकीची कसलीही सीमाच ठेवली नाही. हे लोक माणुसकीशून्य खोटे कथानक रचत आहेत. त्यानंतर ‘इस्रायल संरक्षण दलाच्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये तो नेता ठार झाला. इस्रायलने ‘जशास तसे’ उत्तर दिले, तसा विचार आपण भारतीय कधी करणार ?
अरब देश छोटासा इस्रायलही सोडत नाहीत. त्यासाठी ते युद्ध करत आहेत आणि आतंकवाद माजवत आहेत. भारतात प्रतिदिन कितीतरी भूमी वक्फ बोर्डाकडून कह्यात घेतली जात आहे ?, तसेच काश्मीरमध्ये कितीतरी भूमीवर आतंकवाद्यांनी ताबा घेतला आहे. धर्मांध थोडीही भूमी सोडायला सिद्ध नसतात. वक्फ बोर्ड हिंदूंच्या भूमी हडप करत आहे किंवा आपले काही हिंदू स्वतःच्या भूमी त्यांना विकत आहेत; परंतु हिंदूंना त्याचे काहीच वाटत नाही.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विद्युत् रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी !
वातव्याधी आणि आयुर्वेदातील ‘पेन मॅनेजमेंट (वेदना व्यवस्थापन)’
कतारपासून कोळशापर्यंत : अखेर भारत स्वतःचे ऊर्जेवरील अवलंबित्व सोडू शकेल का ?
… तर जात्यात जाण्याची वेळ कधीही येऊ शकते !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !