मोदी-ट्रम्प यांच्यात १६ महिन्यांनी फ्रान्समध्ये झाली प्रत्यक्ष बैठक !
भारतीय नाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य दिले गेले पाहिजे ! - मोदी

एवियन (फ्रान्स) – मोदी वाटाघाटी करणारे कणखर नेते आहेत. मोदी पंतप्रधानपदी असेपर्यंत भारताची जागतिक स्तरावर मोठी भूमिका राहील. मोदी अत्यंत शांत डोक्याचे; परंतु कणखर नेते आहेत. उभय देश यापेक्षा जवळ येऊ शकत नाहीत. जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले. येथील ‘जी ७’च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदी यांच्यात साधारण १६ महिन्यांनी भारतीय वेळेनुसार १७ जूनच्या रात्री साडेसातच्या दरम्यान प्रत्यक्ष बैठक पार पडली.
🇮🇳🤝🇺🇸 PM Modi and President Trump met on the sidelines of the G7 Summit in France after 16 months.
Trump called Modi a “tough and calm leader” and said, “If India is attacked, we will stand with India.”
Modi stressed the safety of Indian sailors amid the Iran crisis and… pic.twitter.com/FclA1LjeDA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, इराण युद्धात भारतीय नाविकांचा मृत्यू दु:खद आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडी रहाणे, हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोर दिला.
पंतप्रधान म्हणाले की, लाखो भारतीय नाविक आज जगभरात कार्यरत असून जागतिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण यांच्या करारात नाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य दिले गेले पाहिजे.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड