|
काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला.
(सौजन्य : Republic Bharat)
आंदोलनाच्या वेळी माजी पतंप्रधान के.पी. ओली शर्मा यांच्या यू.एम्.एल्. या पक्षाची युवाशाखा ‘युबसंघ’च्या कार्यकर्त्यांसमवेत हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर सरकारने सैन्याला सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. हे आंदोलन श्री. दुर्गा परसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ते एक उद्योगपती असून पूर्वी ते माओवादी होते.