|
(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)
नवी देहली – केवळ प्रमाणपत्राच्या नावाने एक कागदाचा तुकडा दिल्याने इस्लामी कायद्यानुसार एखाद्या वस्तूला ‘हलाल’ (योग्य) किंवा ‘हराम’ (अयोग्य) म्हटले जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे काम जे लोक आणि संस्था करत आहेत, ते गुन्हेगार आहेत. पहिली गोष्ट त्यांनी इस्लामी कायद्याच्या विरोधात काम केले आहे. त्यांनी कागदाचा तुकडा देऊन ‘ही वस्तू हलाल आहे’, असे सांगितले आहे. दुसरी गोष्ट की, जर त्यांनी प्रमाणपत्र दिले नसते, तर ग्राहकाने स्वतः पडताळून वस्तू ‘हलाल’ आहे कि ‘हराम’ आहे ?, हे शोधले असते; मात्र प्रमाणपत्र देऊन अशा लोकांची फसवणूक करण्यात येत आहे, अशी टीका ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी हलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामी संस्थांवर केली. उत्तरप्रदेश सरकारने हलाल उत्पादने आणि त्यांना देण्यात येणारी प्रमाणापत्रे यांवर बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर मौलाना रझवी बरेलवी बोलत होते.
सौजन्य Uttar Pradesh Uttarakhand Daily
मौलाना रझवी बरेलवी यांनी मांडलेली सूत्रे
१. ज्या संस्था अशा प्रकारची प्रमाणपत्रे देत आहेत, ती धर्माच्या नावाखाली मुसलमानांना धोका देत आहेत. हा असा व्यवसाय आहे, जो अल्लाच्या नावाने चालू होतो. जगात अल्लाच्या नावाने चालू होणार दुसरा असा कुठलाही व्यवसाय नाही.
२. ‘हलाल’ प्रमाणीकरण केवळ मांसाचेच केले जाऊ शकते. जर अन्य गोष्टींवर हलाल शिक्का मारण्यात येत असेल, तर तो चांगल्या शब्दाचा दुरुपयोग आहे. इस्लामी कायद्यानुसार हलाल केवळ प्राण्यांच्या मांसासाठीच वापरण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य वस्तू योग्य किंवा अयोग्य असू शकतात; मात्र त्यांना हलाल शिक्का मारला जावू नये.
३. काही संस्थांनी हलाल प्रमाणीकरणाचे व्यवसायिकरण करणे चालू केले आहे. प्रत्येक गोष्टीला हलाल प्रमाणीत करण्यासाठी प्रमाणपत्र देऊन त्याला उत्पन्नाचे साधन बनवले आहे. त्यांनी इतके टोक गाठले की, भाज्या, फळे, बिस्किट आदीं खाण्या-पिण्याच्या वस्तूही हलाल प्रमाणित केल्या. मुसलमान संस्थांना अशा गोष्टी करण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे.
४. उत्तरप्रदेश सरकारने हलाल संदर्भात एका मंडळाची स्थापना करावी आणि अशा लोकांना दायित्व द्यावे, जे इस्लामी कायद्यानुसार काम करण्यास सक्षम आहेत.