वीर सावरकर उवाच !

गोवा, पुद्दूचेरी यांसारख्‍या वसाहतीतून आणि देशातील इतर ठिकाणच्‍या भागात वावरणारी ख्रिस्‍ती धर्मप्रचारक संघटना भारतविरोधी शत्रूंसारखी बलिष्‍ठ होत आहे. धर्मावरचा विश्‍वास नष्‍ट होणे, म्‍हणजेच श्रीकृष्‍ण, श्रीराम, भरत, छत्रपती शिवाजी  महाराज यांच्‍या परंपरेशी संबंध तुटणे होय. ‘धर्मांतर करणे, म्‍हणजे माझे पूर्वज हे माझे नव्‍हते’, असे म्‍हणण्‍यासारखे आहे. धर्मांतरामुळेच राष्‍ट्रीय इतिहास, राष्‍ट्रीय आचार पालटतात. हा पालट, म्‍हणजे उघड उघड राष्‍ट्रांतरच ! वनवासी लोकांना हिंदूंपासून वेगळे काढण्‍यासाठी मिशनर्‍यांनी आदिवासी हा शब्‍द रूढ केला. आपण तो शब्‍द न वापरता वन्‍यसमूह, वनवासी हा घटनेतील शब्‍दच वापरावा आणि ते वनवासी हिंदू आहेत, हे सुद्धा निक्षून सांगावे. तशी त्‍यांच्‍यात जागृती करावी.

संकलक : श्री. दुर्गेश परुळकर

(साभार : ‘सावरकरांची सामाजिक भाषणे’, ‘३४ पाद्रीस्‍तान मुळांचे उखडा ही नवी पूर्वसूचना तरी नीट ऐका !’ आणि ‘समग्र सावरकर खंड ९’ या ग्रंथांतून)