भोंदू संतांच्या अशा दुष्प्रवृत्तीला रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक क्षेत्रात फसवणूक करणारे लोक घुसून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणताही वेश परिधान करतात. रावणानेसुद्धा साधूचे रूप घेऊन सीतेचे अपहरण केले होते. त्यामुळे खरे साधू निंदनीय होत नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातही काही लोक स्वतःची पात्रता नसतांनाही वैद्यकीय व्यवसाय करून जनतेचे शोषण करत आहेत; परंतु अशा भोंदू वैद्यांमुळे चांगले वैद्य निंदनीय होत नाहीत. राजकीय क्षेत्रातही काही असामाजिक घटक घुसले आहेत. त्यामुळे खरे राजकारणी निंदनीय होत नाहीत. असेच काही धूर्त, भोंदू आणि पाखंडी लोक यांनी हिंदु संतांचे रूप घेऊन अन् संतांचे नाव धारण करून आश्रम बनवतात. त्यामुळे खरे संत किंवा त्यांचे आश्रम निंदनीय होत नाहीत. तरीही पाश्चात्त्य मेकॉले पद्धतीत शिकले सवरलेले लोक अशा एखाद दुसर्‍या घटनांच्या आधारावर हिंदु धर्माला कलंकित करत असतील, तर त्यांना रोखणे, हे आपले कर्तव्य आहे आणि हिंदु धर्माची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या निंदा करणार्‍या कुणाही भोंदू संतांच्या अशा दुष्प्रवृत्तीला रोखण्यासाठी शक्य असेल, तेवढे प्रयत्न आपण करायला पाहिजेत.

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २००६)