कपूरथळा (पंजाब) – येथील सुलतानपूर लोधी भागात असलेल्या गुरुद्वारा श्री अकाल बुंगा साहिबचे काही निहंगांनी अनधिकृत नियंत्रण घेतले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर निहंगांनी गोळीबार केला. यात एक पोलिसाचा मृत्यू झाला, तर १० पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. गुरुद्वारामध्ये अजूनही ३०-४० सशस्त्र निहंग लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड
गुरुद्वाराच्या ताब्यावरुन दोन गटांत वाद चालू आहे. २२ नोव्हेंबरच्या रात्री पोलिसांनी कह्यात घेतलेल्या १० निहंगांना अटक केली. या प्रकरणातील आणखी काही निहंगांना अटक करण्यासाठी पोलीस गुरुद्वारामध्ये गेले होते. त्या वेळी निहंगांनी गोळीबार केला. या वेळी पोलीस कर्मचारी जसपाल सिंह यांचा मृत्यू झाला, तर पोलीस उपायुक्त भुलथ भारतभूषण सैनी, तसेच काही उपनिरीक्षक अन् हवालदार, असे एकूण १० पोलीस घायाळ झाले.
संपादकीय भूमिकाकायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले पंजाब राज्य ! जेथे पोलीसच सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसाधारण जनतेच्या सुरक्षिततेची काय कथा ! |