पनवेल – पनवेल बस आगाराच्या परिसरात ३ बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी ४ दिवसांपूर्वी कह्यात घेतलेे. या तिघांची नावे अली हाफीज शेख, रबीवुल मनन शेख आणि मेसन किसलू मुल्ला अशी आहेत. हे तिघेही काही मासांपासून विना पारपत्र नवी मुंबईतील दारावे गावात रहात होते. या तिघांनीही बांगलादेश आणि भारत सीमेवरून घुसखोरी केली होती. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले असून त्यांना लवकरच कायदेशीर कार्यवाहीनंतर त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहेत.
या प्रकरणात अजून काही बांगलादेशी नागरिक नवी मुंबईत रहातात का ?, याची चौकशी पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकागेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेल्या घुसखोरीवर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांनी परिणामकारक उपाय न काढल्याचा हा परिणाम आहे ! |