पेशवाईच्या काळातील एक किस्सा सांगितला जातो. एका चतुर व्यक्तीने ‘पितळी दरवाजा’ म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्याच्या वेशीवर ठाण मांडले. राजानेच ‘जकात वसुलीसाठी आपली नेमणूक केली आहे’ अशा आविर्भावात तो तिथे मालाच्या गोण्यांवर शिक्के मारून त्याबदल्यात व्यापार्यांकडून पैसे घेई. त्याविषयी त्याने स्वत: कधी काहीच सांगितले नव्हते; पण एकाने शिक्का मारून घेतला म्हणून दुसर्याने करत हळूहळू साराच माल हा गोमा गणेशच्या शिक्क्याने वेशीतून आत जाऊ लागला. यातून त्याने भरपूर पैसा कमावला. पुढे राजाला याची कुणकुण लागल्यावर त्याने गोमा गणेशला पकडून आणले. गोमाने स्वतःची बाजू मांडतांना म्हटले, ‘‘हा शिक्का मारून घ्यायलाच हवा’, अशी मी कुणाला सक्ती केलेली नव्हती. ‘राजाने असा आदेश दिला आहे’, असेही मी कधी कुणाला सांगितले नव्हते. ‘ज्याला शिक्का मारून हवा त्याने १ होन (तत्कालीन चलन) द्यावा आणि शिक्का मारून घ्यावा’ इतकेच मी म्हटले होते. मी केवळ ‘येथे मालावर शिक्के मारून मिळतील’, इतकेच लिहिले होते. ‘त्याविना माल आत नेता येणार नाही’, असेही मी कुठले म्हटलेले नव्हते. ज्या व्यापार्यांनी स्वतःहून ‘शिक्के मारून द्या’, असे म्हटले, त्यांना मी ते उमटवून दिले इतकेच.’’ गोमा गणेश याने तसा कोणताच गुन्हा केलेला नसल्याने राजाला त्याला मुक्त करावे लागले. उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने कोणताही अधिकार नसतांना हलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामी संस्थांवर कारवाई करण्यास प्रारंभ करत राज्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्री यांवर बंदीच घातली आहे. उद्या गोमा गणेश सारखा युक्तीवाद हलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामी संस्थांनी करण्यास चालू केले, तर आश्चर्य वाटू नये. ‘मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार योग्य असलेली उत्पादने विकली, तर त्यांच्याकडून ती घेतली जातील’, अशा उद्देशाने या आस्थापनांनी इस्लामी संस्थांकडे हलाल प्रमाणपत्र घेऊन उत्पादनांवर त्याचा उल्लेख केला. आम्ही त्यांना ‘असे प्रमाणपत्र घ्याच’, असे सांगण्यासाठी गेलो नव्हतो’, अशा प्रकारचा युक्तीवाद या संस्था उद्या करू लागतील. कायद्यानुसार येथे या संस्था निर्दोष सुटण्याची शक्यता नाही; कारण कोणताही अधिकार नसतांना अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणे, हा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा होणारच यात शंका नाही. त्याचसमवेत प्रमाणपत्रासाठी घेण्यात येत असलेला पैसा कुठे वापरला गेला आणि जात आहे, याचीही चौकशी होणार आहे.
शिक्क्याचा परिणाम !
गोमा गणेशाच्या शिक्क्यावरून असेही पुढे झाले असेल की, ‘गोमा गणेश पितळीवाला’ असा शिक्का नसलेला माल अवैधरित्या शहरात आला आहे आणि त्यावर कारवाई करायला हवी’, अशी मानसिकता प्रशासकीय कर्मचार्यांची, तसेच पुढे तो माल ज्या किरकोळ व्यापार्यांकडे गेला असेल, त्यांच्यातही निर्माण झाली असेल. याचा अर्थ असा की, ‘उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्राचा पाकिटावर उल्लेख नाही’, याचा अर्थ ‘हे उत्पादन मान्यताप्राप्त नाही’, अशा प्रकारचा विचार ग्राहकांमध्ये होऊ शकतो, तसेच मुसलमान हलाल प्रमाणपत्राचा उल्लेख नसणारे पदार्थ विकत घेण्याचे टाळतील. आमची उत्पादने विकली जात नाहीत, असे सांगत आणि ‘आम्हाला हलाल प्रमाणित उत्पादने हवीत’ असे सांगत सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याद्वारे एक अधिकृत यंत्रणा हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी निर्माण करण्याची मागणी होऊ शकते. याकडेही गांभीर्याने पहायला हवे. अशी मागणी कुणी केली, तर त्याला तितकाच जोरदार विरोध वैध मार्गाने करावा लागेल. योगी आदित्यनाथ यांनी हलाल प्रमाणपत्रावर कारवाई करण्याचा आदेश देऊन पुढे असे काहीतरी घडू शकते, हे थांबवण्याचाच एक प्रकारे प्रयत्न केला, असेही लक्षात घ्यायला हवे.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३ १५३१७ |
समाजाची मानसिकता !
समाजासमोर एकच गोष्ट सातत्याने दाखवली, तर ती योग्य आहे आणि ती तशीच असली पाहिजे, असा संस्कार समाजावर होतो. विशेषतः लहान मुलांवर तो अधिक होतो. ही मुले मोठी झाली की, ‘आमच्या लहानपणी हे असे होते आणि तेच योग्य होते अन् आताही तसेच असायला हवे’, अशा प्रकारची मानसिकता निर्माण होते. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास हिंदी चित्रपटसृष्टीने हिंदु धर्माविषयी चुकीच्या गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली निर्माण केल्या आहेत. हिंदी चित्रपटातील अभिनेत्र्या कपाळावर टिकली किंवा कुंकू लावत नाहीत. हातात बांगड्या घालत नाहीत, हिंदु मंदिरातील पुजारी किंवा ब्राह्मण टवाळखोरीचा विषय असतात, त्यामुळे ‘हे असेच असते आणि असेच असले पाहिजे’, अशी मानसिकता समाजात निर्माण होते आणि त्याचे अनुकरण केले जाते. हिंदु धर्माची प्रतिमा अशीच रंगवल्यामुळे हिंदु समाज निधर्मीवादी, पुरो(गामी) बनला आणि हिंदु धर्मातील धर्माचरणाला टिंगलटवाळीचा विषय बनवू लागला. हिंदु स्वतःहून हिंदु धर्म, देवता, ग्रंथ आदींचा अवमान करू लागले. धर्माचरण करणे, म्हणजे धर्मांधता, तालिबानी वृत्ती, असे बोलण्यासही ते कमी करत नाहीत. ‘आम्ही प्रेक्षकांना आमचे चित्रपट, कथा, पेहराव आदी स्वीकारण्याचे बंधन घातले नव्हते. समाजानेच स्वतःहून ते स्वीकारले’, असेच चित्रपट निर्माते सांगतील. त्यामुळे समाजासमोर धर्मानुसार जे योग्य आहे, तेच दर्शवले पाहिजे. योग्य किंवा अयोग्य गोष्ट सतत समोर ठेवल्यावर त्याचाच संस्कार मनावर होतो, हे समजून घेऊन शासनकर्ते, प्रशासन, विचारवंत आदींनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.