डेहराडून (उत्तराखंड) येथील हिंदु युवकाच्या आत्महत्येमागे मुसलमान तरुणीचा हात !

  • युवकाच्या वडिलांच्या आरोपात तथ्य आढळल्यावर गुन्हा नोंद !

  • तरुणी आणि तिचे कुटुंबीय फरार !

डावीकडून रोहित शर्मा आणि अलीशा

डेहराडून (उत्तराखंड) – येथील २१ वर्षीय हिंदु तरुण रोहित शर्मा याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी अलीशा, तिचे वडील इम्तियाज, आई रेशमा आणि मामा नदीम यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितचे वडील महिपाल शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्या मुलाला अलिशाने प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि तिच्या कुटुंबियांनी त्याचा मानसिक छळ केला. त्याला मारहाणही करण्यात आली होती. त्यामुळेच त्यांच्या मुलाला आत्महत्या करण्यासारखे कठोर पाऊल उचलावे लागले, असा आरोप या तक्रारीत त्यांनी केला आहे. शर्मा यांच्या आरोपात तथ्य असल्याचे आढळल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

१. २५ ऑक्टोबर या दिवशी विष प्राशन केल्यानंतर २ नोव्हेंबर या दिवशी रोहितचा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला होता.

२. महिपाल शर्मा म्हणाले की, रोहितने विष प्राशन करेपर्यंत मला दोघांच्या प्रेम प्रकरणाविषयी काहीच ठाऊक नव्हते. रोहितच्या भ्रमणभाषमधील रोहित आणि अलीशा यांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ माझ्या हाती पडले. त्यामध्ये तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे लक्षात येते. यासह २५ ऑक्टोबर म्हणजे ज्या दिवशी रोहितने विष प्राशन केले, त्या दिवशीही तो अलीशाच्या घरी गेला होता, तसेच त्या दिवसापासूनच अलीशा आणि तिचे कुटुंबीय फरार आहेत. यातून माझ्या मुलाच्या हत्येत त्यांचाच हात आहे, हे स्पष्ट आहे.

३. या प्रकरणाचे अन्वेषण करणारे पोलीस उपनिरीक्षक सनोज कुमार यांनी सांगितले की, आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका 

जर एखाद्या घटनेत एका हिंदु मुलामुळे मुसलमान मुलीने आत्महत्या केल्याची कुणी आवई जरी उठवली असती, तरी साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी कंपूने एक जात हिंदूंना अत्याचारी संबोधायला आरंभ केला असता, हेच सत्य आहे !