श्री कानिफनाथ देवस्थानला दर्गा संबोधून तेथील पूजा बंद पाडल्याचे प्रकरण
राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) – येथील गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानात ऐन दिवाळीत मुसलमान दंगलखोरांनी धुमाकूळ घातला. दीपावलीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भजनांचा कार्यक्रम चालू असतांना अचानक मुसलमान जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’, असे म्हणत मंदिरातील पुजारी आणि भाविक यांना मारहाण केली. चालू असलेली पूजा आणि भजन बंद पाडले. या घटनेचा निषेध करत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो, त्या दृष्टीने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. तरी यात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे आणि धर्मांधांवर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी, याविषयीचे निवेदन समस्त वारकरी संप्रदाय, नाशिक यांनी १६ नोव्हेंबर या दिवशी निफाड तहसील कार्यालयात दिले. या प्रसंगी जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदाय उपस्थित होता.