
कोल्हापूर – रंकाळा तलावाजवळ अल्पवयीन हिंदु मुलीस घेऊन फिरण्यासाठी आलेल्या धर्मांध समीर बिजली याला चोप देऊन ‘हिंदु एकता आंदोलना’च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले. कार्यकर्त्यांच्या तक्रारींनंतर त्याच्यावर ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी हिंदू एकताच्या ३ कार्यकर्त्यांना अटक केली; मात्र त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणात जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून मुसलमान युवकांकडून हिंदु युवतींची छेड काढणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, असे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणांची पोलिसांनी तात्काळ नोंद घ्यावी. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक) शहरात असे प्रकार आढळल्यास हिंदु एकताच्या कार्यकर्त्यांना संपर्क करावा.’’
भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी दृष्टीने अर्थ लावून हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचणारे शेल्डन पॉलॉक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर