शिकण्‍यासाठी शिकणारा आणि शिकवणारा अशा दोन्‍हींची आवश्‍यकता असणे

न स्‍वल्‍पमप्‍यध्‍यवसायभीरोः करोति विज्ञाननिधिर्गुणं हि ।
अन्‍धस्‍य किं हस्‍ततलस्‍थितोऽपि प्रकाशयत्‍यर्थमिह प्रदीपः ॥

– हितोपदेश, मित्रलाभ, सुभाषित १६५

अर्थ : एखादा माणूस महापंडित (विज्ञाननिधी) असला, तरी तो निश्‍चयापासून ढळलेल्‍या माणसाला यत्‍किंचितही लाभ करून देऊ शकत नाही. आंधळ्‍या माणसाच्‍या तळहातावर ठेवलेला दिवासुद्धा त्‍या आंधळ्‍याला कोणतीही वस्‍तू दाखवू शकत नाही. वस्‍तू दिसण्‍यासाठी डोळा आणि दिवा दोन्‍ही लागतात. एकाने भागत नाही. त्‍याचप्रमाणे शिकण्‍यासाठी इच्‍छा आणि गुरु दोन्‍ही लागतात. एकाने भागत नाही.