भगवंताच्‍या प्रेमामुळे ज्‍याला समाधान मिळाले तोच खरा भाग्‍यवान !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांना) एकाने प्रश्‍न केला, ‘आपण भाग्‍यवान कुणाला मानता ?’ श्रीमहाराज म्‍हणाले, ‘ज्‍याच्‍याजवळ भगवंत आहे, तो खरा भाग्‍यवान होय. पैका (पैसा) पुष्‍कळ असणे, प्रपंच मनासारखा असणे, प्रकृती बरी असणे, विद्या पुष्‍कळ असणे, मान-सन्‍मान असणे, ही काही भाग्‍याची लक्षणे नव्‍हेत. भगवंताकडे आणि त्‍याच्‍या नामाकडे ज्‍याचे चित्त वळत नाही, तो उत्तम प्रापंचिक असला, तरी अभागीच समजावा. भगवंताच्‍या प्रेमामुळे आलेले समाधान हे खरे भाग्‍यवंताचे लक्षण मी मानतो.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)