वर्ष २०२४ अमेरिकेसाठी विनाशकारी ! –  क्रेग हॅमिल्टन पार्कर यांची भविष्यवाणी

क्रेग हॅमिल्टन पार्कर

वॉशिंग्टन (अमेरिका) – भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेतील अनेक शहरे नष्ट होतील, असे भाकित ‘नवीन नॉस्ट्रेडॅमस’ म्हणून ओळखले जाणारे क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी म्हटले आहे. पार्कर यांनी पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक संकटांमुळे अमेरिकेतील बहुतेक भागांत अंधार पसरेल. मोठे नैसर्गिक संकट किंवा आपत्ती यांमुळे अनेक शहरांमधील वीज पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा नष्ट होतील, परिणामी सर्वत्र ‘ब्लॅक आऊट’ (अंधार) होईल. तसेच पुढील वर्षी अमेरिकेत मोठा भूकंप होणार आहे.