‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Lakshamipujan
‘अंधःकाराला दूर सारून तेजाची उधळण करणारा सण म्हणजे ‘दिवाळी’ ! दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. पुराणात असे वर्णन आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जेथे स्वच्छता, प्रामाणिकपणा, काटकसरीपणा असेल तेथेच लक्ष्मी आकर्षित होते, तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते.
श्री महालक्ष्मीदेवीची कृपा सर्व साधकांवर रहावी, अलक्ष्मी (निर्धनता) चा परिहार व्हावा आणि धर्मकार्यासाठी समृद्धता यावी यासाठी, सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने २४.१०.२०२२ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्रीलक्ष्मी आणि श्री कुबेर यांचे पूजन केले.
पूजनाच्या वेळी श्रीलक्ष्मी देवीचे चित्र, श्री कुबेराची मूर्ती यांच्यासमवेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि त्यांच्या कंठात असलेले श्रीवत्स पदक अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कंठातील श्रीम् यंत्राचेही पूजन करण्यात आले. ‘लक्ष्मीपूजनाचा पूजनातील घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आले. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला.
१. श्री लक्ष्मीपूजनातील घटकांची केलेली निरीक्षणे
लक्ष्मीपूजनाच्या मांडणीतील सर्व घटकांची म्हणजे हिशोबाची वही, श्रीलक्ष्मीदेवीचे चित्र, कुबेराची मूर्ती, चांदीचे नाणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि त्यांच्या कंठात असलेले श्रीवत्स पदक, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कंठातील श्रीम् यंत्र अन् पुरोहित साधक या सर्वांच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर चाचण्या करण्यात आल्या. त्यांची निरीक्षणे पुढे दिली आहेत.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. चाचणीचे निष्कर्ष
अ. लक्ष्मीपूजनाच्या मांडणीतील घटकांमध्ये पूजनापूर्वी नकारात्मक ऊर्जा आढळली. लक्ष्मीपूजनानंतर त्यांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
आ. लक्ष्मीपूजनाच्या मांडणीतील सर्व घटकांमधील सकारात्मक ऊर्जा पूजनानंतर विलक्षण वाढली.
इ. पूजनानंतर पुरोहित साधकांतील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात अल्प होऊन सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ वाढली.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. लक्ष्मीपूजनापूर्वी पूजेतील घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : आजकाल वातावरण रज-तमप्रधान असल्याने सर्वच वस्तूंवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येण्याची शक्यता असते. लक्ष्मीपूजनातील घटकांवर आवरण असल्याने पूजनापूर्वी त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली.
३ आ. लक्ष्मीपूजनानंतर पूजेतील घटकांमधील सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढणे : महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात २४.१०.२०२२ या दिवशी करण्यात आलेल्या श्री लक्ष्मीपूजनामध्ये पूजक म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या श्री महालक्ष्मी स्वरूप आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे. त्यांनी स्वतः भावपूर्ण लक्ष्मीपूजन केल्याने संपूर्ण वातावरणात श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रसारित झाले. याचा सकारात्मक परिणाम लक्ष्मीपूजनातील घटकांवर होऊन त्यांतील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) अनेक पटीने वाढल्याचे चाचणीतून दिसून आले.
३ इ. पुरोहितांनी श्री लक्ष्मीपूजनविधी भावपूर्ण केल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : ‘पुरोहितांची आध्यात्मिक पातळी, त्यांना आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, पठण करतांनाची त्यांच्या मनाची स्थिती आणि त्यांचा भाव इत्यादी घटकांवर ते एखाद्या विधीतील चैतन्य किती प्रमाणात ग्रहण करू शकतात ?’, हे अवलंबून असते. या चाचणीतील पुरोहितांमध्ये देवीप्रती भाव आहे. त्यांच्यातील भावामुळे त्यांनी देवीचे चैतन्य चांगल्या प्रमाणात ग्रहण केले. त्यामुळे पूजनानंतर त्यांंच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ वाढली. यातून ‘पुरोहितांनी कोणताही विधी करतांना तो भावपूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात येते.
३ ई. सनातन संस्थेच्या धर्म आणि राष्ट्ररक्षण यांच्या कार्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीने आशीर्वाद देणे : सनातनच्या रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन अत्यंत भावपूर्ण केले. पूजनानंतर पूजेतील सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेत झालेली विलक्षण वाढ पहाता ‘सनातन संस्था करत असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य, तसेच धर्म अन् राष्ट्ररक्षणाचे कार्य यांतील अडथळे दूर होऊन सनातन संस्थेला सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी श्री महालक्ष्मीदेवीने आशीर्वाद दिला’, असे जाणवले.’
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.९.२०२३)
ई-मेल : [email protected]
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |