रत्नागिरी – शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिख भाडे आकारू नये. खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्या प्रति कि. मी. भाडेदराच्या ५० टक्के पेक्षा अधिक रहाणार नाही (मूळ भाडे + ५०% अधिकचे भाडे) असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ या दिवशी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.
प्रवाशांनी असे जादाचे भाडे आकारणारे बस मालक तसेच चालक यांच्या विरुध्द पुराव्यानिशी लेखी स्वरूपात छायाचित्रासह या कार्यालयाच्या ई-मेल पत्त्यावर [email protected] अथवा ०२३५२-२२९४४४ या कार्यालयाच्या क्रमांकावर तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन अजित ताम्हणकर यांनी केले आहे.