भारत हा खेड्यांचा, शेतकर्यांचा देश ! शेतीला अत्यंत उपयोगी पडणारे आपले मानवेतर साहाय्यक, म्हणजे गाय आणि बैल ! कृतज्ञतेनेच आपण गायीला ‘गोमाता’ म्हणतो; म्हणूनच आपण गोवत्सपूजा करून दीपावलीचा प्रारंभ करतो.
सर्वदेवमये देवि सर्वदेवैरलङ्कृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नन्द़िनि ॥
अर्थ : जिच्यात सर्व देवतांचा वास आहे, अशा सर्व देवतांनी अलंकृत असलेल्या हे देवी नंदिनी, माझी मनोकामना पूर्ण कर.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक)