अमेरिकेत भारतियांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यात ४० टक्क्यांनी वाढ !

न्यूयॉर्क – अमेरिकेत गेल्या २ वर्षात भारतियांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि आक्रमणे, यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात ४० टक्के अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या एका मासात वर्णद्वेषातून ४ भारतियांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. नुकतेच न्यूयॉर्कमध्ये एका वृद्धाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी एका भारतीय विद्यार्थ्यावर चाकूने वार करण्यात आला.

१.‘कार्नेगी एंडोमेंट’च्या अभ्यासानुसार, प्रत्येक २ भारतियांपैकी एकाने रंगाच्या आधारावर भेदभाव होत असल्याचे मान्य केले आहे. अलीकडे गोर्‍या पोलिसांनी जान्हवी नावाच्या २३ वर्षीय भारतीय तरुणीला मारहाण केली होती. त्यांनी हानाभरपाईविषयी तिला उद्देशून निर्लज्जपणे विनोद केला होता.

२. भारतियांवर आक्रमण करण्यामागचे कारण म्हणजे अमेरिकेतील गोर्‍या कट्टरवाद्यांना भारतियांविषयी द्वेष आहे. भारतीय त्यांच्या आर्थिक संधी हिरावून घेत असल्याचा त्यांचा दावा आहे.

३. भारतियांचे सरासरी उत्पन्न वर्षाला १ लाख डॉलर आहे, तर अमेरिकन लोकांचे उत्पन्न केवळ ७५ सहस्र डॉलर आहे. अमेरिकेच्या ‘फॉर्च्युन-५००’ मध्ये समाविष्ट असलेल्या ६० आस्थापनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय आहेत. अमेरिकन लोकांना भारतियांची प्रगती सहन होत नाही.

संपादकीय भूमिका 

हे रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलणार आहे ?