डेहराडून – सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल, असे मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे सांगितले. ते शहरातील क्रीडा मैदानात आयोजित दिव्य दरबारात सहस्रावधी भाविकांना संबोधित करत होते. या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी स्वामी धीरेंद्र शास्त्री यांचे स्वागत केले. स्वामी धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदु राष्ट्राच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आणि धर्मांतराला विरोध केला.
स्वामी धीरेंद्र शास्त्री म्हणाले की
१. देवभूमी उत्तराखंडमध्ये दर्गे आणि मशिदी यांचा झपाट्याने विस्तार होत आहे. आता बाबरला हटवून रघुवरचे नाव वाढवण्याची आवश्यकता आहे. हा देश बाबरचा नसून रघुवराचा आहे. उत्तराखंड हा भारताचा मुकुट आहे.
२. जेव्हा शरीर दुसरे रक्त स्वीकारू शकत नाही, तर मग दुसरा धर्म का स्वीकारायचा ? उत्तराखंडात सनातन-सनातन दिसले, तरच भारत हिंदु राष्ट्र होईल. उत्तराखंडच्या डोंगरावर मशीद नव्हे, तर श्रीराममंदिर बांधणे आवश्यक आहे.