‘३०.१०.२०२३ या दिवशी माझा मामा श्री. धैवत वाघमारे याचा वाढदिवस होता. त्या दिवशी संध्याकाळी ‘आज मामाचा वाढदिवस असूनही मी त्याच्यासाठी काही केलेे नाही’, असा विचार माझ्या मनात आला; पण ‘आधी भावप्रयोग करूया’, या विचारांने मी परम पूज्यांचे स्मरण केले. तेव्हा सूक्ष्मातून ‘परम पूज्य मला मामाचे गुणवर्णन सांगत आहेत’, असे दृश्य दिसले. ते गुणवर्णन ऐकून मला पुढील काव्य स्फुरले.
अकस्मात् मम पुण्यायीने ।
भगवंत आज मज भेटला ।
म्हणाला, ‘काय हवे सांग तुला’ ॥ १ ॥
हे करुणाकरा, सांगावा मज साधनेतील आदर्श ।
कसा जिंकावा मनाचा संघर्ष ।
कसा असावा सदैव मनी हर्ष ॥ २ ॥
गुरुमाऊलीने केले स्मित ।
सांगितले साधनेचे गुपित ।
मन भगवंताचे जिंकण्यास ॥ ३ ॥
म्हणाला, ‘बघ, मामाकडे तुझ्या ।
देह त्याने प्रारब्धावरी सोडला ।
सतत भगवंताचा धावा केला ॥ ४ ॥
सोपवली त्याने चिंता भगवंतावरी ।
त्याची आहे श्री गुरूंवर श्रद्धा न्यारी ।
प्रसंगात साधनेच्या दृष्टीने चिंतन करी ॥ ५ ॥
धर्माप्रमाणे करतो आचार ।
लेख लिहिण्यातून करतो प्रचार ।
गुरूंच्या विचारांचा मनोभावे ॥ ६ ॥
स्वभावदोष आणि अहं गुरुचरणी अर्पीले ।
भावभक्तीने त्याने भगवंताला ओवाळीले ।
अन् परिपूर्ण सेवेचे पुष्पही गुरुचरणी वाहिले ॥ ७ ॥
साधनेला वाहिले त्याने संपूर्ण जीवन ।
त्रास होवो शारीरिक किंवा आध्यात्मिक ।
श्रद्धेने करतो तो त्यावर सदैव मात ॥ ८ ॥
असतो तो सदा सकारात्मक ।
नित्य करीतो तो भगवतभक्तीचे रसपान ।
काव्यातूनही करतो भगवंताचे गुणगान ॥ ९ ॥
आज्ञाधारक आणि आहे तो तत्पर ।
गुरुचरणांचा ध्यास आणि साधनेची तळमळ ।
नेईल त्याला प्रगतीच्या शिखरावर ॥ १० ॥
साधनेच्या गुणवैशिष्ट्यांनी आहे तो परिपूर्ण ।
परि त्याला नाही त्याचे कर्तेपण ।
‘स्व’विषयी जणू तो आहे अजाण ॥ ११ ॥
करेल तो प्रगती सत्वर ।
कृतज्ञ मी तव चरणी भगवंता ।
असा साधनेचा आदर्श तू मला दिला ॥ १२ ॥
– कु. सायली रवींद्र देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |