‘स्पेनमध्ये वर्ष १९४० पासून आतापर्यंत रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये ४ लाखांपेक्षा अधिक अल्पवयीन आणि प्रौढ मुली यांचे लैंगिक शोषण झाले आहे, अशी माहिती एका अहवालात समोर आली. अत्याचार करणार्यांमध्ये बहुतांश लोक हे पाद्री असल्याची धक्कादायक माहितीही यात देण्यात आली आहे. स्पेनचे राष्ट्रीय लोकपाल एंजल गॅबिलोंडो यांनी ही माहिती अहवालात दिली आहे. या अहवालात पीडितांना भरपाई देण्यासाठी राष्ट्रीय निधी उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा अहवाल स्पेनच्या संसदेत सादर करण्यात आला. मार्च २०२२ मध्ये स्पॅनिश संसदेने चर्चवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.’