सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी आश्रमात झालेल्या ‘भैरवी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१९.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘भैरवी यागा’चे आयोजन करण्यात आले होते. यागाचा उद्देश पुढीलप्रमाणे होता, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, साधकांच्या सर्व त्रासांचे निवारण व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी.’ या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. याग चालू होताच यागाच्या धुरात मला सूक्ष्मातून एक देवी दिसली; परंतु तिचे नाव मला समजले नाही.

२. यज्ञकुंडातून वातावरणात निळा आणि सोनेरी या रंगांच्या दैवी कणांचे प्रक्षेपण होऊ लागले.

३. यज्ञकुंडात ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर काही अनिष्ट शक्तींना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्या थोड्या वेळासाठी यागापासून दूर निघून गेल्या.

४. मला यज्ञवेदीपासून अर्धा फूट उंचीवर मध्यभागी सूक्ष्मातून एक गुलाबी रंगाची कमळाची कळी दिसली. त्यानंतर तिची एकेक पाकळी हळूहळू उमलू लागली. तेव्हा मला श्वेत रंगाचे वस्त्र परिधान केलेली एक देवी कमळाच्या मध्यभागी बसलेली दिसली. त्या वेळी मला ‘ही देवी कोण आहे ?’, असा प्रश्न पडला. तेव्हा त्याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून पुढील ज्ञान प्राप्त झाले, ‘ती देवी मनुष्याच्या कंठातील स्वरांशी संबंधित आहे.

साधक यागाच्या वेळी करत असलेले मंत्रोच्चार शुद्ध, मधुर आणि भावयुक्त होते. त्यावर प्रसन्न होऊन ती देवी यज्ञकुंडामध्ये काही क्षणांसाठी प्रगट झाली होती.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक