संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर केली शस्त्रांची पूजा !

तवांग (अरुणाचल प्रदेश) –  भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. संरक्षणमंत्र्यांनी तवांगमध्ये दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर शस्त्रांची पूजा केली. या वेळी संरक्षणमंत्र्यांनी तवांग येथील युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. अरुणाचल प्रदेशातील बाम ला सीमेवरून सीमेपलीकडे असलेल्या चिनी चौक्यांचेही संरक्षणमंत्र्यांनी विश्‍लेषण केले.

१. भारत-चीन वादाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्र्यांनी दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर तवांग येथे शस्त्रपूजन करणे याला विशेष महत्त्व आहे. भारत-चीनमध्ये अनेक दिवसांपानूस सीमा विवाद चालू असून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर तैनात आहे.

२. चीन अरुणाचल प्रदेश त्याचा भाग असल्याचा दावा करत आहे, तर भारत चीनचा हा दावा सतत फेटाळून लावतो.

३. तवांग हे तिबेटच्या सहाव्या दलाई लामा यांचे जन्मस्थान आहे. तवांगचा बौद्ध मठ तिबेटी बौद्ध धर्मासाठीही अतिशय पवित्र मानला जातो. यामुळे चीनला तवांगवर नियंत्रण मिळवून तिबेटवर त्याचा प्रभाव वाढवायचा आहे.

संपादकीय भूमिका 

यामुळे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठल्यास नवल नाही !