शिवसेना आमदार पात्रतेविषयीच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले !
नवी देहली – शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या प्रकरणाची १७ ऑक्टोबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. विधानसभेच्या अध्यक्षांकडून सुनावणीला होत असलेल्या विलंबावरून ‘तुम्ही निर्णय घेत नसाल, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल’, या शब्दांत न्यायालयाने पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले.
सौजन्य एबीपी माझा
यापूर्वी १३ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमदार पात्रतेच्या निर्णयावरील सुनावणीचे सुधारित वेळापत्रक सादर करण्याची सूचना विधानसभेच्या अध्यक्षांना केली होती; मात्र अध्यक्षांच्या वतीने राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सादर केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणताही पालट नसल्याचे न्यायालयाला आढळून आले. यामुळे न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना अध्यक्षांशी बोलून दसर्याच्या सुट्टीच्या कालावधीत सुनावणीचे सुधारित वेळापत्रक सादर करण्याची सूचना केली. ठाकरे गटाकडून या सुनावणीला आमदार अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित होते.