कोल्हापूर – नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापूर महापालिकेच्या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवा १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत भाविकांसाठी चालू होत आहे. या विशेष बससेवेच्या आगाऊ आरक्षण तिकीट विक्रीचा शुभारंभ १३ ऑक्टोबरला शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते ‘के.एम्.टी.’च्या ‘श्री शाहू मैदान पास वितरण केंद्र’ येथून करण्यात आला.
या प्रसंगी प्रथम पास खरेदी करण्यासाठी श्री. प्रशांत आणि सौ. प्रियांका पाटील, सौ. शुभांगी पाटील, सौ. मनीषा कोळी, असे भाविक प्रवासी, दुर्गादर्शन बस सेवाप्रमुख सुनील जाधव, वाहतूक निरीक्षक रवी धुपकर यांसह कर्मचारी, प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ‘के.एम्.टी.’कडे प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेले ज्येष्ठ चालक दशरथ आण्णा मंडले यांचा सत्कार नंदकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.