इराणची इस्रायलला धमकी !
तेहरान (इराण) – इस्रायलकडून हमासवर आक्रमण चालूच आहे. इस्रायलने यापूर्वीच गाझा पट्टीतील पाणी, वीज आणि अन्न पुरवठा बंद केला आहे. त्याच्याकडून सहस्रो बाँब आणि रॉकेट गाझा पट्टीवर प्रतिदिन डागण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलला ‘गाझा पट्टीवरील बाँबवर्षाव थांबवला नाही, तर चौफेर युद्धास प्रारंभ होईल’, अशी धमकी दिली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीरबदोल्लाहियन हे लेबनॉनची राजधानी बेरूट येथे पोचल्यावर त्यांनी लेबनॉनच्या अधिकार्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना वरील धमकी दिली.