नवी देहली – हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध पाचव्या दिवशीही चालू आहे. या युद्धातील काही शौर्याच्या बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत. इस्रायलच्या एका महिला सैन्याधिकार्याने हमासच्या २५ आतंकवाद्यांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. इनबल लिबरमॅन असे या महिला सैन्याधिकार्याचे नाव आहे. ती इस्रायलच्या निर एम् किबुत्ज या शहराची सुरक्षाप्रमुख आहे.
हमासच्या आतंकवाद्यांकडून रॉकेटसचा मारा करण्यात येत असतांना इनबल लिबरमॅन यांनी सैनिक आणि नागरिक यांना शस्त्रास्त्रे वाटली. लिबरमॅन आणि अन्य अधिकारी हे काही घंटे गनिमी काव्याने आतंकवाद्यांशी युद्ध करत करतांना लबरमॅन यांनी २५ आतंकवाद्यांना ठार मारले. यामुळे हे शहर आतंकवाद्यांच्या कह्यात जाण्यापासून वाचले, असे म्हटले जात आहे. इस्रायल सरकारने त्यांच्या शौर्याची नोंद घेत त्यांचा सन्मान केला आहे.
संपादकीय भूमिकाइस्रायलसारखे आतंकवादी आक्रमण भारतात झाल्यास हिंदूंना स्वतःचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण आहे का ? |