इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्धाचे परखड विश्‍लेषण !

१. इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्धात अमेरिकेने प्रवेश केला आहे. इस्रायलच्‍या साहाय्‍यासाठी अमेरिकेची विमानवाहू जहाजे, ‘एफ् १६’ आणि ‘एफ् ३५’ लढाऊ विमाने पश्‍चिम आशियात तैनात करण्‍यात आली आहेत. या संघर्षाचे स्‍वरूप व्‍यापक होण्‍याचे संकेत यातून मिळत आहेत. भारताला ऊर्जास्रोतांचे पर्याय सज्‍ज ठेवावे लागणार असून त्‍यासाठी रशिया हा उत्तम पर्याय आहे. याचसमवेत तेथे अडकलेल्‍या भारतियांना सोडवण्‍यासाठी मोहीम राबवणे, हे दुसरे मोठे आव्‍हान असेल.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

२. हमासने इस्रायलवर आक्रमण केल्‍यानंतर तात्‍काळ संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेची विशेष आपत्‍कालीन बैठक बोलावली गेली. अमेरिका, फ्रान्‍स यांच्‍यावरील आतंकवादी आक्रमणांनंतरही अशा बैठका त्‍वरित झाल्‍या. पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांनी मुंबई, पठाणकोट, पुलवामा येथे भीषण आक्रमणे केली; मात्र संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेने कधीही अशी बैठक बोलावली नाही.

३. इस्रायलच्‍या लष्‍करी सामर्थ्‍याची आपण बरोबरी करू शकत नाही, याची हमासला कल्‍पना आहे. एका इस्रायली नागरिकाचा हमासच्‍या आक्रमणात मृत्‍यू झाला, तर इस्रायल कसा भीषण प्रतिआक्रमण करतो, हेही हमासने अनुभवले आहे. तरी शेकडो इस्रायली नागरिकांना मारण्‍याचे धाडस हमासमध्‍ये आले कुठून ? हमास एकटी नसून तिने केलेले आक्रमण हे सामूहिक कटाची परिणती आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक (९.१०.२०२३)