नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) येथील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर धाड घातली. देहली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोंदवलेल्या २ गुन्ह्यांच्या अंतर्गत ईडीने ही कारवाई केली. हे गुन्हे अमानतुल्ला खान अध्यक्ष असलेल्या देहली वक्फ बोर्डातील नोकर्यांमधील अनियमिततेशी संबंधित आहेत. (भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनातून स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचे आमदार, नेते हेच भ्रष्टाचारात अडकत चालले आहेत, यावरून तरी देशातील भ्रष्टाचार नष्ट होण्याची शक्यता नाही, हेच लक्षात येते ! – संपादक)