जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या ६३ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७३ वर्षे) यांचा भाद्रपद कृष्ण सप्तमी (५.१०.२०३) या दिवशी ७३ वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना आलेल्या अनुभूती आणि साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांना ७३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत गेल्यावर केलेले सूक्ष्मातील प्रयोग आणि त्यांना आलेल्या अनुभूती
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. तेव्हा सनातनच्या ६३ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी या तेथे होत्या. गुरुदेव मार्गदर्शनाला येण्यापूर्वी पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांनी काही सूक्ष्मातील प्रयोग केले. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती येथेे दिल्या आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लादीचा स्पर्श मऊ लागणे
‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत लादीवर चालत होते. तेव्हा गुरुदेव संगणकाजवळ बसतात तेथील आणि त्यांच्या पलंगाच्या जवळची लादी मला अत्यंत मऊ लागली. मला लादी नसून तिथे मलमलसारखे काहीतरी मऊमऊ असल्याचे जाणवले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील देवघरासमोर उभी राहिल्यावर आलेल्या अनुभूती
अ. मी त्यांच्या खोलीतील देवघरासमोर थोड्या अंतरावर उभी राहिले. मी जसजसा माझा हात देवघराच्या जवळ नेऊ लागले, तसा प्रथम माझ्या हाताला गारवा जाणवला. नंतर मला पुष्कळ उष्णता जाणवली.
आ. त्यानंतर मला माझे हात कंप पावत असल्याचे जाणवले. काही वेळाने हाताचा कंप आणखी वाढला.
इ. माझ्या मनाला आनंद जाणवला आणि मन निर्विचार झाले.
मला परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातील समजण्याची क्षमता प्रदान केली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.’
– पू. (श्रीमती) सुशीला मोदी, जोधपूर, राजस्थान. (२६.६.२०२२)
नेहमी शिष्यभावात रहाणार्या पू. (श्रीमती) सुशीला मोदी !जानेवारी २०२२ मध्ये पू. (श्रीमती) सुशीला मोदी काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या प्रवास करून आल्यामुळे त्यांना आश्रमात वावरतांना मुखपट्टी (मास्क) वापरण्यास सांगितले होते. एकदा दुपारी महाप्रसाद घेण्याआधी प्रार्थना केल्यावर त्या लगेचच उठून त्यांच्या खोलीकडे जाऊ लागल्या. तेव्हा मी त्यांच्या मागोमाग गेलो. त्या वेळी माझे त्यांच्याशी झालेले संभाषण पुढे दिले आहे. प्रा. महावीर श्रीश्रीमाळ : पू. भाभी, आपण कुठे आणि कशासाठी निघाला आहात ? मी काही साहाय्य करू का ? पू. सुशीला मोदी : मी माझी मुखपट्टी खोलीत विसरले आहे. ती आणण्यासाठी मी खोलीत चालले आहे. प्रा. महावीर श्रीश्रीमाळ : तुम्ही भोजनकक्षात थांबा. मी खोलीतून तुमची मुखपट्टी आणून देतो. पू. सुशीला मोदी (नकार देऊन) : काल मी खोलीतून बाहेर पडतांना मुखपट्टी लावायला विसरले. आजही विसरले. त्यासाठी प्रायश्चित्त म्हणून मी खोलीत जाऊन मुखपट्टी आणणार आहे. त्यामुळे माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही. असे बोलून त्या त्यांच्या खोलीत जाऊन मुखपट्टी घेऊन आल्या. पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांच्याप्रमाणे सनातनचे अन्य संतही शिष्यभावात रहातात. असे संत दिल्याविषयी परात्पर गुरुदेव आणि सर्व संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! – प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा. (२४.४.२०२२) |
|