दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चौकटीनुसार स्वतःचे त्रासदायक आडनाव पालटून आज्ञापालनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे श्री. अशोक भागवत !

श्री. अशोक भागवत

‘२३.७.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्यान अशी आडनावे पालटा !’, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चौकट प्रसिद्ध झाली होती. सनातनचे साधक श्री. अशोक दहातोंडे यांनी ही चौकट वाचली आणि त्याप्रमाणे त्रासदायक अर्थ असणारे आपले आडनाव पालटून ‘भागवत’, असे आडनाव लावले.

खरेतर समाजातील लोकांना आपल्या आडनावाचा पुष्कळ अभिमान असतो. तो त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय असतो. लोक आपले आडनाव सांगून ‘हे आमचे घराणे !’, असे अभिमानाने बोलत असतात. त्यामुळे ‘स्वतःचे आडनाव पालटणे’, ही गोष्ट त्यांच्यासाठी अवघड आहे, तसेच या प्रक्रियेत सर्वच कार्यालयीन कागदपत्रे, उदा. रेशन कार्ड, आधार कार्ड इत्यादींवरील आडनाव पालटावे लागते. ही प्रक्रियाही मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चौकट वाचून तात्काळ कृती करणारे श्री. अशोक भागवत यांची कृती अनुकरणीय आहे. त्यांनी त्रासदायक अर्थ असणारे आडनाव पालटण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घेतले आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन करून स्वतःचे आडनाव पालटले. धन्य ते साधकांना प्रत्येक कृतीमागील शास्त्र सांगणारे परात्पर गुरु डॉक्टर आणि धन्य ते परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन करणारे श्री. अशोक भागवत यांच्यासारखे साधक !’

– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२३)