ठाणे, २६ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण येथील इतिहासाचे अभ्यासक श्रीराम विनायक साठे यांचे २६ सप्टेंबरला येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. साठे हे मुंबई महानगरपालिकेतून तंत्रज्ञ अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. इतिहास लेखन, वाचन आणि संशोधन हे त्यांचे आवडीचे विषय होते. ते हौशी नाट्य कलाकार होते. मराठी, संस्कृत कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. आकाशवाणीवरून साठे यांनी थोरले बाजीराव, माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील श्रृतिकांचे सादरीकरण केले होते. ‘पेशवे’ या त्यांच्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.