प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – सुरक्षेच्या दृष्टीने कुंभमेळ्यातील सर्व रस्ते, महत्त्वाची ठिकाणी, महत्त्वाची धार्मिक स्थळे आदी ठिकाणी २ सहस्र ७५० सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे सर्व सीसीटिव्ही कॅमेरे नियंत्रित करण्यासाठी ‘इंटिग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटर’ची निर्मिती करण्यात आली आहे.
५२ आसनक्षमता असलेले ४ ‘इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर’ (आयसीसीसी) निर्माण करण्यात आले आहेत. (आयसीसीसी म्हणजे एखाद्या ठिकाणी आपत्ती ओढवल्यास तेथील परिस्थिती हाताळण्यासाठी उभारण्यात आलेला कक्ष) त्रिवेणी संगम, अक्षयवट, लेटे मारुती आदी २६८ गर्दीची ठिकाणी निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी ‘व्हिडिओ एनालिटिक्स’ लावण्यात आले आहेत. यामुळे गर्दीचे चौफेर चित्रीकरण करता येणार आहे. वाहनतळ असलेल्या ठिकाणी गाडीच्या क्रमांकांची छायाचित्रे घेण्यासाठीही १०८ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.