
मुंबई – खैर तस्करी संबंधित काथ निर्मित कारखान्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई केली. त्यामुळे १०२ काथ कारखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. खैर लाकडाच्या तस्करी प्रकरणी चिपळूणमधील कारखाना मालक संशयित होते. आतंकवादविरोधी पथक आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या अधिकार्यांनी काथ निर्मिती कारखान्यावर धाडी घातल्या होत्या. वनविभागाचे संरक्षण व्हावे, या हेतूने जनहित याचिकाही प्रविष्ट केली होती. या याचिकेवर सुनावणी करतांना काथ निर्मिती कारखाने बंद करण्याचे आणि दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १०२ कारखान्यांपैकी ६० कारखाने बंद आहेत, तर ४० कारखाने चालू आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या २ जिल्ह्यांतील खैर तस्करी प्रतिबंधित होईल.