भंडारा येथील अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी हालवली !
नागपूर – गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. त्यामुळे भंडारा शहरातील अनेक सखल भागात पुराचे पाणी शिरायला प्रारंभ झाला होता. त्यामुळे अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी हालवण्यात आली आहेत. भंडारा शहराला पुराचा फटका बसू नये यासाठी गोसीखुर्द धरणाच्या ३३ प्रवेशद्वारांतून ५ लाख ९७ सहस्र ७७५ क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.