कालभैरवासाठी ठेवण्यात येते मुख्य खुर्ची, तर शेजारील खुर्चीवर बसून पोलीस अधिकारी करतात काम !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या न्यायालयीन प्रकरणामुळे सर्व भारतियांचे वाराणसी या प्राचीन नगरीकडे लक्ष लागले असून येथे काशी विश्वनाथाचे रूप असलेल्या बाबा कालभैरवाला ‘कोतवाल’ म्हटले जाते. बाबा कालभैरव हे येथील एका पोलीस ठाण्याचे अंमलदार म्हणून कार्य पहातात, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यांच्यासाठी येथे मुख्य खुर्ची, तसेच पटल आणि टोपीही ठेवण्यात आली आहे. तर ठाण्याचे प्रशासकीय पोलीस अधिकारी शेजारील खुर्चीवर बसून ठाण्याचे संचालन करतात. प्रतिदिन ते बाबा कालभैरवाचा आशीर्वाद घेऊनच कामाला आरंभ करतात. येथील हिंदूंची श्रद्धा आहे की, बाबा विश्वनाथानेच येथे बाबा कालभैरवाची नियुक्ती केली होती.
वाराणसीत बाजीराव पेशव्यांनी वर्ष १७१५ मध्ये बाबा कालभैरवाचे मंदिर उभारले होते. येथेच असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये जेव्हाही कुणा प्रशासकीय पोलीस अधिकार्याची नियुक्ती होते, तेव्हा त्यांना बाबांच्या दरबारात उपस्थित व्हावे लागते. त्यानंतरच ते ठाण्याची सूत्रे हाती घेतात.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या हृदयातील अद्वितीय श्रद्धाच हिंदु धर्माच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा आधार आहे. हे उदाहरणही त्याचेच प्रतीक होय ! |