नेपाळ चीनच्या महामार्ग प्रकल्पात सहभागी होण्याच्या सिद्धतेत !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ लवकरच चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव’  (बी.आर्.आय.) या प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नेपाळने या संदर्भातील सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली असली, तरी चीनचा दावा आहे की, नेपाळने या योजनेच्या अंतर्गत काही भाग पूर्णही केला आहे; मात्र नेपाळच्या सरकारी अधिकार्‍यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. चीनच्या या प्रकल्पाला भारतासह जगातील अनेक देशांनी विरोध केला आहे, तर काही देश आता या प्रकल्पातून बाहेरही पडत आहेत.