श्री. शार्दुल चव्‍हाण यांनी गुरुस्‍मरण केल्‍यावर त्‍यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व जाणवून भावपूर्ण सेवा करता येणे !

कु. शार्दुल चव्‍हाण

२६.११.२०२१ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील स्‍वयंपाकघरात भांडी घासण्‍याची सेवा करत होतो. तेव्‍हा माझ्‍या समवेत कुणीही साधक नव्‍हते. त्‍यामुळे आरंभी मला एकटेपणा जाणवत होता. तेव्‍हा मी गुरुस्‍मरण केल्‍यावर ‘माझ्‍या समवेत गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) सतत आहेत’, याची मला अनुभूती आली. माझे मन पूर्णपणे एकाग्र होऊन मी सेवेशी संपूर्णपणे एकरूप झालो. मला भावपूर्ण सेवा करता आली. ‘माझी सेवा कधी झाली ?’, हेही मला कळले नाही, तसेच माझ्‍यातील एकटेपणा, नकारात्‍मकता आणि ताण इत्‍यादी सर्व निघून जाऊन माझ्‍या मनाचा उत्‍साह वाढला.’

– कु. शार्दुल चव्‍हाण (वय २१ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (१६.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक